आंबेडकर प्रेस कौन्सिलच्या वतीने मूकनायक दिन उत्साहात साजरा

हिंगोली:- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपादित केलेल्या पाक्षिक मूकनायक या नियतकालिकाचा वर्धापन दिन 31 जानेवारी 2021 रोजी आंबेडकर प्रेस कौन्सिलच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला.
हिंगोली शहरातील रेनबो कम्प्युटर्स येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला आणि नियतकालिक मूकनायक या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. यावेळी आंबेडकर प्रेस कौन्सिलचे संस्थापक अध्यक्ष ॲड. रावण धाबे, रेनबो इन्स्टिट्यूटचे प्राचार्य विजयकुमार कांबळे, मराठवाडा केसरीचे कार्यकारी संपादक बिभीषण जोशी, महाराष्ट्र २४ न्यूजचे संपादक सुधाकर वाढवे, हिंगोली माझाचे संपादक रवी शिखरे, आंबेडकराईट पार्टीचे जिल्हा सचिव विनोद भालेराव, लीगल लाईफचे संपादक नागेश अंभोरे, अंकुश देशमाने, बालाजी देशमाने, अंकुश पंडित आदी उपस्थित होते. यावेळी विजयकुमार कांबळे आणि रावण धाबे यांनी मूकनायक बद्दल उपस्थितांना माहिती देऊन मूकनायक बद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. प्रास्ताविक बिभीषण जोशी यांनी तर सूत्रसंचालन सुधाकर वाढवे यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

Dr. Ambedkar As A Journalist